रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या 'Animal' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली; या खास दिवशी होणार रिलीज
Ranbir Kapoor ,Anil Kapoor (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या 'Animal' या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाशी संबंधित टीमने हा चित्रपट 2022 दसऱ्याच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाशिवाय सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणबीरचा आवाज ऐकायला मिळत आहे.

अलीकडेच या चित्रपटाशी संबंधित कलाकार व निर्मात्यांनी 'अ‍ॅनिमल' चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे एक मोशन पोस्टर आहे, ज्यात बॅकग्राऊंडला रणबीर कपूरचा आवाज ऐकायला येत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर म्हणत आहे- 'पापा, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही माझा मुलगा व्हा, मग पहा मी तुमच्यावर कसं प्रेम करतो. कारण त्याच्या पुढच्या आयुष्यात मी मुलगा आणि आपण वडील असाल…तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेम करा, माझ्या नाही. पापा तुम्हाला समजलं ना? आपल्याला समजल्यास पुरेस आहे. (वाचा - Ek Villain Returns: 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, दिशा पटानी हटके अंदाजात केली घोषणा)

चित्रपटाचा हा व्हिडिओ पाहून हा एक सायको थ्रिलर चित्रपट असल्याचं समजतं. जो वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. तथापि, बर्‍याच माध्यमांतील वृत्तांत हा गॅंगस्टर ड्रामा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'कबीर सिंह' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य खलनायक म्हणून दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.