ठरलं! रणबीर कपूर व आलिया भट्ट डिसेंबरमध्ये अडकणार विवाहबंधनात; दोघांच्या कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरु
Ranbir Kapoor and Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक कार्यक्रमात या दोघांच्या लव्हसीनचा प्रत्ययही आला आहे. मात्र हे दोघे लग्न कधी करणार याबाबत नेहमीच उत्सुकता राहिली आहे. या दोघांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या चवीने चघळल्या गेल्या आहेत, परंतु कधीच ठोस माहिती समोर आली नाही. गेल्या वर्षीही असे वृत्त आले होते की, लवकरच दोघे विवाहबंधनात अडकतील. मात्र, या दोघांनी या गोष्टी कधीही गांभीर्याने घेतल्या नाहीत.

आता पुन्हा एकदा आलिया-रणबीरच्या लग्नासंदर्भात एक नवीन बातमी समोर आली आहे. ओपन मॅगझिन मधील राजीव मसंदच्या (Rajeev Masand) कॉलमनुसार,  या दोघांचे लग्न यावर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे, यासाठी कपूर कुटुंबाने तयारीही सुरू केली आहे.

'ओपन' मासिकातील राजीव मसंद यांच्या कॉलमनुसार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोन वर्षांच्या नात्यानंतर, यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधतील. अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastr) 4 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे, त्यानंतर लगेचच ही जोडी सप्तपदी चालेल. 'ब्रह्मास्त्र' हा आलिया आणि रणबीरचा एकत्र पहिला चित्रपट आहे. डिसेंबर पर्यंत सर्वकाही मनाजोगे व्हावे आणि लग्न धुमधडाक्यात पार पडावे म्हणून दोघांच्या कुटुंबीयांनी आतापासूनच लग्नाची तयारी सुरु केली आहे.

(हेही वाचा: सुरु झाली कपूर आणि भट्ट कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी? 2020 मधील मुहूर्त, सब्यसाची बनवणार आलियाचा लग्नाचा लहंगा)

लवकरच कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून या लग्नाची अधिकृत घोषणा केली जाईल. दरम्यान, यापूर्वी स्पॉटबॉय या वेबसाइटने दावा केला होता की, रणबीरचे आई-वडील म्हणजेच ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना रणबीरच्या लग्नाची घाई आहे. त्यामुळे यंदाच्या डिसेंबरमध्ये या लग्नाचा बार नक्की उडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दुसर्‍या अहवालात स्पॉटबॉयने सांगितले होते की, आलिया-रणबीर लग्नाच्या आधी हनिमून डेस्टिनेशन शोधत आहे. अहवालात असेही नमूद केले आहे की आलिया-रणबीर हनीमूनसाठी स्वित्झर्लंड, फिनलँडसह ब्रह्मासची निवड करू शकतात.