अभिनेता राम कपूर ने घटवले 30 किलो वजन, फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण
Ram Kapoor (Photo Credits: Instagram)

सोनी वाहिनीवरील 'बड़े अच्छे लगते है' मालिकेतील एक लोकप्रिय पात्र म्हणजे मिस्टर कपूर अर्थात अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) . गोबरे गोबरे गाल आणि हसमुख चेह-याचा राम कपूर अशी त्याची ओळख. राम कपूर ने जशी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तसतसा तो छोट्या पडद्यापासून थोडा दूर झाला. मात्र त्याची लठ्ठ शरीर हे प्रेक्षकांना कायम लक्षात राहिले. मात्र याच राम कपूर ने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकताच त्याने सोशल मिडियावरुन आपला एक फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना 'जोर का झटका' दिला आहे. या फोटोत त्याने आपले बरेच वजन घटवले असून तो आधीपेक्षा बराच बारीक दिसत आहे.

राम कपूर ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक सेल्फी शेअर केला आहे. यात राम कपूर आपले वजन कमी करण्यासाठी किती मेहनत घेतली असेल, हे स्पष्ट दिसतय. राम ने तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे.

 

View this post on Instagram

 

OMG! What an amazing transformation by Ram Kapoor. Isn't He is looking 20 Years Younger? 👍 . . #ramkapoor

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood) on

मी माझ्या 45 व्या वाढदिवसानंतर वजन कमी करायचे ठरविले होते. त्यासाठी मी कामातून ब्रेक घ्यायचा ठरवले होते, असे राम कपूर ने सांगितले. दिवसातून 2 तास व्यायाम आणि डाएट यात सातत्या ठेवल्याने वजन कमी करण्यास मदत झाल्याचे रामने सांगितले.

हेही वाचा- बॉलिवूडमधील कलाकारांचा फीटनेस मंत्रा जाणून घ्या, 'या' कलाकारांनी घटवले तब्बल 50 किलो वजन

राम कपूर 'कर ले तू भी मोहोब्बत' या वेबसिरिजमध्ये झळकला होता. तर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'लव्हयात्री' या चित्रपटात देखील त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.