राकेश रोशन यांना कॅन्सरचे निदान; हृतिकने शेअर केली भावनिक पोस्ट
Rakesh Roshan & Hrithhik Roshan(Photo Credits: Hrithhik Roshan Instagram)

अभिनेते, दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांना कॅन्सर झाला असल्याचे समोर येत आहे. त्यांना घशाचा कॅन्सर (Throat Cancer) झाल्याचे हृतिक रोशनने (Hrithik Roshan) इंस्टा पोस्ट करत सांगितले. काही दिवसांपूर्वी राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि आज त्यांच्यावर सर्जरी होणार आहे.

याबद्दल हृतिकने एक खास पोस्ट केली आहे. हृतिकने लिहिले की, "आज मी वडिलांना एक फोटो काढूया का असे विचारले. मला ठाऊक होतं, त्यांच्या सर्जरीच्या दिवशीही ते जीमला अवश्य येतील. कारण मी ओळखत असलेल्यापैकी ते अतिशय कणखर व्यक्ती आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातील घशाच्या स्क्वॅमल सेल कार्सिनोमा (Squamous Cell Carcinoma) झाल्याचं  निदान झालं. मात्र त्यावर मात करण्यासाठी ते अधिक सशक्त झाले आहेत. त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख मिळणं हा हे आमचं भाग्य आहे."

हृतिक रोशनच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी राकेश रोशन यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी अभिनेते ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचे खबर समोर आली होती. मात्र ती निव्वळ अफवा असल्याचे कुटुंबियांनी स्पष्ट केले. इरफान खान, सोनाली बेंद्रे हे बॉलिवूड सेलिब्रेटीही कॅन्सरग्रस्त असून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते.