अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या लग्नाळू मनस्थितीत, ट्विट करुन दिली माहिती
Soundarya Rajinikanth | (Photo courtesy: archived, edited images)

Soundarya Rajinikanth Vishagan Vanangamudi Wedding: दक्षिण सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth)पुन्हा एकदा वरबाप होत आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढत आहे. हे वृत्त प्रसारमाध्यमांतून यापूर्वीही झळकले आहे. मात्र, सौंदर्या रजनीकांत (Soundarya Rajinikanth) हिने ट्वीट करुन आपल्या लग्नाळू मनस्थितीबद्दल माहिती देणारे ट्विट केले आहे. त्यामुळे सौंदर्या आणि तिचा विवाह पुन्हा एकदा बातम्यांचा विषय ठरला आहे. सौंदर्या रजनीकांत ही उद्योगपती विशागन वनानगामुडी (Vishagan Vanangamudi) यांच्यासोब विवाहबद्द होत आहे.

सौदर्या रजनीकांत हिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'केवळ एक आठवडा बाकी आहे. नववधूच्या मनस्थितीत.' आपल्याला ठाऊक असेलच की, सौंदर्याचा हा दुसरा विवाह आहे. येत्या 11 फेब्रुवारीला उद्योगपती विशागन वनंगमुडी आणि सौंदर्या रजनीकांत विवाहबंधनात अडकणार आहेत. (हेही वाचा, सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा वरबाप; पाहा काय करतात 'सौंदर्या'पती जावई)

दरम्यान, विशागन याचेही हे दुसरे लग्न आहे. एका वृत्तपत्राची संपादिका कनिखा कुमारन आणि विशानग हे यापूर्वी विवाहबद्ध झाले होते. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टीकू शकले नाही. अल्पावधीतच दोघे विभक्त झाले. त्यांनी घटस्फोट घेतला. दुसऱ्या बाजूला सौंदर्या हिनेही 2010मध्ये उद्योजक अश्विन याच्यासोबत विवाह केला होता. मात्र, त्यांचाही विवाह फार काळ टीकला नाही. सौंदर्या आणि अश्विन यांना पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र, गेल्या वर्षी घटस्फोट घेत दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. सांगितले जाते की, आपल्या मुलीचा संसार वाचविण्यासाठी रजनीकांत यांनी अनेक प्रयत्न केले. पण, त्यांना त्यात यश आले नाही.