Radhika Apte & Dev Patel Sex Scene (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आणि देव पटेल  (Dev Patel) यांचा एक हॉट इंटिमेट सीन सोशल मीडियावर लीक झाला असून त्यामुळे सोशल मीडियात अनेक चर्चांना उधाण आले आहे. हा सीन 'द वेडिंग गेस्ट' (The Wedding Guest)  या सिनेमातील असून यात राधिका आणि देव यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमुळे राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र तिने या विरोधात आवाज उठवला आहे. एका इंटरटेनमेंट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने आपले मत व्यक्त केले. समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवत राधिका म्हणाली की, "द वेडिंग गेस्ट या सिनेमात अनेक सुंदर सीन्स आहेत. मात्र फक्त सेक्स सीनच लीक झाला आणि तो ही केवळ समाजातील मानसिकतेमुळेच." ('द वेडिंग गेस्ट' सिनेमातील राधिका आपटे आणि देव पटेल यांचा बोल्ड सेक्स सीन इंटरनेटवर लीक)

पुढे राधिका म्हणाली की, "लीक झालेल्या सेक्स सीनमध्ये मी आणि देव पटेल दोघेही आहोत. मात्र हा व्हिडिओ केवळ माझ्याच नावाने पसरवला जात आहे. हा व्हिडिओ अभिनेता देव पटेल याच्या नावाने का शेअर केला जात नाही?"

यापूर्वी अनेक मुलाखतीत राधिकाने बोल्ड सीन्स करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते. तसंच मी माझ्या बॉडीबद्दल कम्फर्टेबल असल्याचेही तिने सांगितले होते.