Rocketry Trailer Released: आर माधवन दिग्दर्शित 'रॉकेट्री- द नाम्बी इफेक्ट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
Rocketry Trailer (PC - Twitter)

Rocketry: The Nambi Effect Trailer Released: 'रेहाना है तेरे दिल में', 'रंग दे बसंती' आणि '3 इडियट्स' या चित्रपटांनंतर आर माधवनने (R. Madhavan) चित्रपटसृष्टीत एका मोठ्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता माधवनचा चित्रपटाचा प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. माधवनने 'रॉकेट्री - द नाम्बी इफेक्ट' चित्रपटासह दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण केलं आहे. गुरुवारी माधवनने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात माधवन नव्या लूकमध्ये दिसून आला. सध्या माधवनवर संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'रॉकेट्री - द नाम्बी इफेक्ट' हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. माधवनने पाच भाषांचे ट्रेलर एकाच वेळी ट्विटरवर शेअर केले आहेत. 'रॉकेट्री - द नाम्बी इफेक्ट' हा बायोग्राफिकल ड्रामा चित्रपट आहे. ज्यात रॉकेट सायंटिस्ट आणि इस्रोच्या एरोस्पेस अभियंता नाम्बी नारायणन यांची कथा आहे. नाम्बीवर इतर देशांसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली. 1996 मध्ये सीबीआयने त्यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले आणि 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नाम्बी नारायणन यांना 'नॉट गिल्टी' म्हणून घोषित केलं. 2019 मध्ये त्यांना पद्मभूषण सारख्या नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. (वाचा - Tezaab Remake: माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'तेजाब' चित्रपटाचा होणार रिमेक, मुराद खेतानने विकत घेतले हक्क)

नांबी नारायणनच्या भूमिकेत माधवनने उत्कृष्ट काम केले आहे. या चित्रपटात माधवनचे पात्र बदलताना दाखवण्यात आले आहेत. तसेच चित्रपटात नाम्बी यांच्या पत्नीची भूमिका सिमरनने साकारली आहे.

हिंदी ट्रेलरमध्ये शाहरुख खानची एक झलक पाहायला मिळते. तथापि, तो केवळ कॅमियो करत आहे. शाहरूख आर माधवन म्हणजेचं नाम्बी नारायणन यांची मुलाखत घेताना दिसत आहे. हा चित्रपट उन्हाळ्यात रिलीज होईल. अर्थात पठाण चित्रपटाच्या अगोदर प्रेक्षक शाहरुखला या चित्रपटात पाहू शकतील.

अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलेब्सनी केलं माधवनचं कौतुक -

माधवनच्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियामध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, कंगना रनौत, महेश बाबू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्रेलरचे कौतुक केले आहे.