R Madhavan रूपेरी पडद्यावर साकारतोय उद्योगपती Ratan Tata यांची भूमिका? पहा याबाबत खुद्द त्यानेच केलेला खुलासा
आर माधवन आणि रतन टाटा (Photo Credits: Instagram)

अभिनेता आर माधवन (Ranganathan Madhavan) हा हिंदी आणि तमिळ सिनेसृष्टीमधील चार्मिंग आणि दर्जेदार अभिनेत्यांपैकी एक आहे. मोजकेच चित्रपट केले असले तरीही त्याच्या कामाची रसिकांच्या मनावर मोहिनी आहे. त्यामुळे आगामी कोणता सिनेमा आर माधवन करणार याची सतत्याने उत्सुकता असते. लवकरच त्याचा Maara आणि Rocketry: The Nambi Effect हे सिनेमे येणार आहेत. पण सोशल मीडीयात मागील काही दिवसांपासून आरा माधवन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यावर आधारित एका सिनेमामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र यावर आता आर माधवनने स्वतःच खुलासा करत अशाप्रकारे कोणताही प्रोजेक्ट तो करत नसल्याचं त्याने स्पष्ट केले आहे. #ThrowbackThursday: रतन टाटा यांनी शेअर केला तरुणपणीचा लूक, भल्या भल्या अभिनेत्यांना ही मागे टाकेल; एकदा पहाच

आर माधवनने केलेल्या ट्वीट मध्ये त्याने खुलासा करताना म्हटलं आहे की, 'दुर्देवाने अशाप्रकारे कोणताही प्रोजेक्ट मी करत नाही. याबद्दल कोणतीही चर्चा देखील झाली नाही किंवा पाईपलाईनमध्येही हा प्रोजेक्ट नाही. केवळ काही चाहत्यांची अशी इच्छा असल्याने त्यांनी बनवलेले हे पोस्टर आहे.'

आर माधवन ट्वीट

ट्वीटरवर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्याने हा खुलासा केला आहे. सध्या रतन टाटा यांच्यावर एक बायोपिक बनवली जात असल्याच्या चर्चा आहेत. हा सिनेमा Soorarai Pottru फेम Sudha Kongara करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

रतन टाटांच्या बायोपिकमध्ये आर माधवन नसला तरीही तो आगामी सिनेमा एक बायोपिक करत आहे. इस्त्रोचे वैज्ञानिक Nambi Narayanan यांची तो भूमिका साकारत आहे. आर. माधवन या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं नाव Rocketry - The Nambi Effect असे आहे.