प्रियंका चोप्राचा खुलासा ; लहानपणापासून आहे 'या' आजाराने पीडित
प्रियंका चोप्रा (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक धक्कादायक खुलासा केला आहे. प्रियंकाने सोमवारी ट्विटरवर एका जाहिरातीचे शूटिंग शेअर केले. त्यात ती म्हणते की, तिला लहानपणापासूनच अस्थमा आहे. पण त्यामुळे तिचे करिअर थांबले नाही. यासंदर्भात तिने ट्विट केले की, ''मला नीट ओळखणाऱ्या लोकांना ठाऊक आहे की, मला अस्थमा आहे. आणि यात लपवण्यासारखे काहीच नाही. अस्थमाने माझ्यावर नियंत्रण मिळवण्यापूर्वी मी त्यावर नियंत्रण मिळवले. जोपर्यंत माझ्याजवळ माझे इनहेलर आहे, तोपर्यंत माझे लक्ष्य साध्य करण्यापासून आणि सुरळीत आयुष्य जगण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही.''

प्रियंका सध्या अभिनेता फरहान अख्तर आणि जायरा वसीमसोबत 'द स्काई इज पिंक' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सत्य घटनेवर आधारीत या सिनेमाचे दिग्दर्शन सोनाली घोष करत आहेत. मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमान या ठिकाणी सिनेमाचे शूटिंग करण्यात येणार आहे. सिनेमाचे  संवाद जूही चक्रवर्तीने लिहिले आहेत. प्रीतम चक्रवर्ती हे सिनेमाचे संगीतकार आहेत. तर सिनेमाच्या निर्मितीची सुत्रं रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ राय कपूरने हाती घेतली आहेत. व्हिडिओ : वाढदिवसानिमित्त प्रियंकाने निकला दिली 'ही' खास भेट !

वृत्तानुसार, द स्काय इज पिंकची कथा आयशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. १३ वर्षांची असल्यापासून तिला फुफ्फुसासंबंधित आजार असून देखील प्रेरणादायी वक्ता झाली.