व्हिडिओ : वाढदिवसानिमित्त प्रियंकाने निकला दिली 'ही' खास भेट !
प्रियंका चोप्रा-निक जोनस (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाचा झेंडा अगदी हॉलिवूडमध्येही रोवला. याच हॉलिवूडमध्ये तिची ओळख गायक, अभिनेता निक जोनससोबत झाली. मग ओळख, मैत्री, प्रेम असा हा प्रवास घडत गेला. हा प्रवास आता जीवनसाथी होण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. लवकरच देसीगर्ल परदेसी होणार आहे. निक-प्रियंका त्यांच्या रिलेशनशीपमुळे कायम चर्चेत असतात. त्यातच भर पडली ती या व्हिडिओची.

निकने नुकताच २६ वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये प्रियंकाने त्याला एक खास गिफ्ट दिल्याचे पाहायला मिळते. निकने कॅलिफोर्नियामधील अँग्ल स्टेडिअममध्ये वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्याचा भाऊ जॉय जोनास आणि प्रियंका चोप्रा देखील उपस्थित होती.

निकचा वाढदिवस स्पेशल होण्यासाठी प्रियंका प्रयत्न करत होती. या खास प्रसंगी प्रियंकाने स्वतःहुन निकला किस केलं. विशेष म्हणजे प्रथमच या दोघांनी सर्वांसमोर उघडपणे किस केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला असून हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे.

उघडपणे किस करणारं हे पहिलंच सेलिब्रेटी कपल नाही. तरी देखील निक-प्रियंका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.