सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे जोरदार वारे वाहत आहेत. बॉलिवूडचे तीन स्टार्स लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असून देसी गर्ल प्रियंका चोप्रा अमेरिकन पॉप स्टार निक जोनससोबत डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहे. त्यापूर्वी प्रियंकाचे न्यूयॉर्कमध्ये ब्रायडर शॉवर पार पडले. या पार्टीला बॉलिवूडच्या अभिनेत्रींही हजेरी लावली.
सोनाली बेंद्रे आणि नीतू सिंग या अभिनेत्रींनी प्रियंकाचा ब्रायडर शॉवर सोहळ्यात हजेरी लावली. पाहुया त्यांचे काही फोटोज...
काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरसोबत ऋषी कपूरने फोटो शेअर करत आजारावर उपचार घेण्यासाठी अमेरिकेत जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्यासोबत नीतू कपूरही सध्या अमेरिकेत आहेत. तसंच कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी सोनाली बेंद्रे देखील अमेरिकेत आहे.
View this post on Instagram
त्यामुळे प्रियंकाचा ब्रायडर शॉवर सोहळ्याला त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांचे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत.