प्रियंका चोप्रा आणि निक जोनस (Photo credit : Instagram)

2018 हे भारतीयांसाठी खास ठरले होते. त्या वर्षी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार लग्नाच्या बंधनात अडकले होते. यामध्ये एक महत्वाचे नाव सामील होते ते म्हणजे प्रियंका चोप्रा-जोनास (Priyanka Chopra- Jonas). देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि आंतरराष्ट्रीय गायक, अभिनेता निक जोनास (Nick Jonas) यांची जोडी जागतिक स्तरावर हिट जोडप्यांच्या यादीत समाविष्ट आहे. आज 1 डिसेंबर रोजी हे जोडपे त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करीत आहे. 2018 मध्ये याच दिवशी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघे विवाह बंधनात अडकले होते. या दिवसाचे औचित्य साधून प्रियंका आणि निक या दोघांनीही रोमँटिक फोटो शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंकाच्या लग्नाचा कार्यक्रम तीन दिवस चालला होता. त्याचबरोबर त्यांचे लग्न ख्रिश्चन आणि हिंदू रीतिरिवाजांनी झाले होते. जगप्रसिद्ध उम्मेद भवन पॅलेसमध्ये आयोजित केलेल्या या भव्य विवाह सोहळ्यासाठी जगभरातील नामांकित पाहुणे उपस्थित होते. प्रियंका चोप्राने तिच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास हेलिपॅड डिझाइन केले होते. आज प्रियंका आणि निक दोघांनीही सोशल मिडियावर काही फोटो पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा: आदित्य नारायण वरात घेऊन निघाला आपली 'दुल्हनियां' श्वेता अग्रवाल ला घ्यायला, पाहा धमाल व्हिडिओ आणि फोटोज)

प्रियंका चोप्राने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हे कपल वॉक घेताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना प्रियंका लिहिते, ‘माझ्या आयुष्यातील प्रेम, निक तुला लागाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू नेहमीच माझ्यासोबत उभा असतोस, तू माझी शक्ती आहेस तसेच तू माझा कमकुवतपणा आहेस. तू माझे सर्वस्व आहेस. आय लव्ह यु.’

त्याचसोबत निकने त्यांच्या लग्नातील एक फोटो पोस्ट करत प्रियंकाला शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो पोस्ट करताना तो लिहितो, ‘सर्वात छान, प्रेरणादायक आणि सुंदर स्त्रीशी लग्न करून दोन वर्षे झाली. प्रियंका लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय लव्ह यु’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी पार पडलेले प्रियंका आणि निक यांचे लग्न हा एक जागतिक सोहळ्याप्रमाणे होता. जगभरातून अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या. इतकेच नाही तर बुर्ज खलिफावर पुन्हा लग्न करण्यासाठी या दोघांना निमंत्रित करण्यात आले होते.