ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यात देसी गर्ल प्रियंका चोप्रा लावणार ठुमके !
ईशा अंबानी, नीता अंबानी आणि प्रियंका चोपड़ा (Photo Credits: Facebook)

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या विवाहानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani) देखील लवकरच विवाहबद्ध होणार आहे. बिजनेसमन आनंद पिरामलसोबत ईशा अंबानी विवाहबद्ध होणार असल्याने अंबानी-पिरामल दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. ईशाच्या लग्नाचे खास आकर्षक असणार आहे ते म्हणजे देसी गर्ल आणि ईशाची खास फ्रेंड प्रियंका चोप्राचा परफॉर्मन्स. संगीत सोहळ्यात प्रियंका चोप्रा आपला खास परफॉर्मन्स सादर करणार असल्याचे बोलले जात होते. ईशा अंबानी-आनंद पिरामल यांचे नवे घर; किंमत ऐकून थक्क व्हाल

पण आता फिल्मफेअरमधील वृत्तानुसार, प्रियंकाचा परफॉर्मन्स ईशाच्या संगीत सोहळ्यात नाही तर लग्नसोहळ्यात होणार आहे. प्रियंकाचा हा परफॉर्मन्स सोलो नसून ईशाच्या मैत्रिणी देखील प्रियंका चोप्रासोबत थिरकणार आहेत. या सगळ्याची जोरदार प्रॅक्टिस या मुलींनी सुरु केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील इतर स्टार्सही प्रियंकाला साथ देणार आहेत.

ईशाचे प्री वेडिंग सेलिब्रेशन 8-9 डिसेंबरला उदयपूरमध्ये होणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला ईशा-आनंदचा शाही विवाहसोहळा इटलीत पार पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeta Ambani (@neetaambani2159) on

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा देखील बॉयफ्रेंड निक जोनससोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे. या शाही लग्नसोहळ्यातील अनेक कार्यक्रम 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान होणार आहेत.