Priyanka Chopra Celebrates Ganesh Chaturthi: Priyanka Chopra ने मुलगी Malti सोबत लॉस एंजेलिसमध्ये साजरी केली गणेश चतुर्थी; See Photos
Malti Mary Jonas (PC - Instagram)

Priyanka Chopra Celebrates Ganesh Chaturthi: बॉलिवूड स्टार्समध्ये गणेश चतुर्थी सेलिब्रेशन मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. स्टार्सनी सोशल मीडियावर आपापल्या स्टाइलमध्ये हा सण साजरा केला आहे. सर्व स्टार्सनी गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) ची मुलगी मालती मेरी जोनास (Malti Mary Jonas) हिच्या बाप्पासोबतच्या फोटोंनी युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसांपासून लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. परदेशात असूनही प्रियांका आपल्या चाहत्यांना भारतीय महिला म्हणून ओळख करून द्यायला विसरत नाही. परदेशातही अभिनेत्री भारतातील प्रत्येक सण साजरे करतात. केवळ स्वतःच नाही तर ती मालती मेरी जोनासला तिच्या भारतीय मुळांशी जोडून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी साजरी झालेल्या गणेश चतुर्थीची झलक दाखवली आहे. (हेही वाचा -Salman Khan ची बहिण Arpita च्या घरी बाप्पांचे आगमन; कुटुंबाने एकत्र साजरी केली गणेश चतुर्थी (Watch Video))

बिंदी आणि बांगड्यांमध्ये दिसली मालती -

एका फोटोत मालती खेळण्यातील गणपतीसोबत खेळताना दिसत आहे. ती गणपतीला मिठी मारताना दिसत आहे. तिने कपाळावर बिंदी लावली असून हातात बांगड्या घातल्या आहेत. या लूकमध्ये मालती खूपच क्यूट दिसत आहे. प्रियांकाने या फोटोंना कॅप्शन दिले आहे, 'एक मुलगी आणि तिचा गणपती. आम्ही कुठेही जातो तेव्हा तो नेहमी आमच्या सोबत असतो...'

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मालती तिच्या घराच्या मंदिरासमोर बसलेली दिसत आहे. या मंदिरात गणपती बाप्पाची छोटी मूर्ती आहे. बाप्पासोबतचे मालतीचे हे गोंडस फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिचे मनापासून कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट केली, 'तुला अभिमान आहे की तू तुझ्या मुलीला भारतीय परंपरा शिकवून वाढवत आहेस आणि ती किती गोंडस आहे. मला आशा आहे की ती देखील तिच्या आईप्रमाणे जगात स्वतःचे नाव कमवेल. गणपती बाप्पा मोरया. अशातच दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'विघ्नहर्ता तुमच्या मुलीवर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद देत राहो.'