Sudhir Mishra (PC- IANS)

सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीपासून ते विद्यार्थ्यांच्या फी वाढीपर्यंत झालेल्या विद्यार्थी चळवळीवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांना लवकरच रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा (Sudhir Mishra) यांनी या चळवळींवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये जामिया मिलिया विद्यापीठाबाहेर (Jamia Millia University) सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे विद्यार्थी तसेच विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांचे पात्रही दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात 1975 आणि 1977 मध्ये झालेल्या विद्यार्थी चळवळींचादेखील समावेश असणार आहे. यात निर्भया प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलनही दाखवण्यात येणार आहे.

सुधीर मिश्रा यांनी 1987 मध्ये 'ये वो मंजिल तो नहीं' या चित्रपटाची निर्मीती केली होती. आता मिश्रा याच चित्रपटाचा रिमेक करणार आहेत. त्यावेळी या चित्रपटात काम करणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आदी कलाकरांनी अभिनयाबद्दल पैसे घेतले नव्हते. सुधारित नागरिकत्व विधेयकाला राजधानी दिल्लीमध्ये जोरदार विरोध झाला. त्यावेळची काही दृष्य पाहून सुधीर मिश्रा यांना या चित्रपटाची कल्पना सुचली. (हेही वाचा - Films to watch in 2020: यंदा प्रदर्शित होणाऱ्या 'या' बॉलिवूड चित्रपटांची यादी तुम्हाला माहित आहेत का? पाहा कोणत्या चित्रपटात रंगणार चुरस)

विशेष म्हणजे सुधीर मित्रा यांनी या चित्रपटाची कथा लिहण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नुकतीच झालेली विद्यार्थी चळवळ दाखवण्यात येणार आहे असून 1975 आणि 1977 मध्ये झालेली विद्यार्थी चळवळही दाखवण्यात येणार असल्याचे सुधीर मिश्रा यांनी सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून उद्याचा भारत कसा असणार आहे, याचे चित्रही साकारण्यात येणार आहे. जामिया विद्यापीठाबाहेर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थींनीनी आपल्या मित्रांना वाचवले. या चित्रामुळे मला चित्रपट निर्मितीची प्रेरणा मिळाली. मी कोणात्याही पक्षाच्या विरोधत तसेच कोणत्याही विचारधारेवर आधारित चित्रपट करणार नाही, असेही सुधीर मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.