Kareena Kapoor Khan चं Pregnancy Yoga Photoshoot अनेकांसाठी ठरेल परफेक्ट फिटनेस गोल (View Pics)
Kareena Kapoor Khan (Photo Credit: Instagram)

अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने तिची दुसरी प्रेगन्सी जाहीर केल्यापासून तिच्या प्रत्येक लहान-मोठ्या अ‍ॅक्टिव्हिटीज तिने सोशल मीडियामध्ये शेअर केल्या आहेत. दरम्यान गरोदरपणाच्या काळातही तिने अनावश्यक गोष्टींचा बाऊ न करता काम सुरू ठेवलं होतं. दरम्यान मागील काही काळात कोविड 19 चं संकट सावरत तिने काही शोज्चं शूटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये काही सिनेमांचं उर्वरित शूटिंग वेब शोज वॉट वूमन्स वॉन्ट आणि काही जाहिरातींचं शुटिंग केलं आहे.

नुकतेच करिना कपूर खानने गरोदरपणाच्या काळात काही काळ स्वतःला शांत करण्यासाठी योगासनं करत असल्याचं सांगत काही योगासनांच्या पोजेस मधील फोटोज शेअर केले आहेत. करिनाने नुकत्याच एका मुलाखती मध्ये सांगताना स्त्रियांना त्यांची गर्भावस्थेमुळे मुद्दामून कामातून ब्रेक घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. उलट गरोदरपणाच्या काळात स्त्रिया जितक्या अ‍ॅक्टिव्ह राहतील, आनंदी राहतील ते बाळासाठी फायदेशीर आहे असे तिने म्हटलं आहे. नक्की पहा: Anushka Sharma ने गर्भावस्थेत आपला पती विराट कोहलीच्या मदतीने केले शीर्षासन, फोटो शेअर करत अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद, See Pic.

करिना कपूर फोटो शूट

करिना कपूर योगा पोज

दरम्यान काही महिन्यांपूर्वी करिनाने लेखक म्हणून देखील पदार्पण केलं आहे. Kareena Kapoor Khan’s Pregnancy Bible असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये तिने आई होणार्‍या महिलांना सल्ला दिला आहे. यामध्ये महिलांचं डाएट कसं असावं, मॉर्निंग सिकनेस वर कशी मात कराल इथपासून काही सल्ले दिले आहेत. पुढील महिन्यात करिना दुसर्‍या बाळाला जन्म देईल.