Jayeshbhai Jordaar Poster: जयेशभाई जोरदारचे पोस्टर रिलीज, ट्रेलर 19 एप्रिल होणार प्रदर्शित
Jayeshbhai Jordar (Photo Credit - Twitter)

रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordar) या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. चित्रपटाचा ट्रेलर 19 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. (Jayeshbhai jordaar Trailer Release) त्याचबरोबर रणवीर सिंहने आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. त्याने या चित्रपटाचे नवीन पोस्टर (Movie Poster) रिलीज केले आहे. चित्रपटाचे हे पोस्टर पाहून तुमचीही उत्सुकता वाढेल. रणवीर सिंहने पोस्टरसोबत दिलेले कॅप्शनही त्याच्या चाहत्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी पुरेसे आहे. पोस्टरमध्ये रणवीर सिंहच्या मांडीवर लहान बाळाचा फोटो  दिसत आहे. तसेच पोस्टरवर लिहिले आहे, 'जयेशभाईंना मुलगा होईल की मुलगी?' त्याचवेळी रणवीर सिंहने कॅप्शनमध्येही हेच लिहिले आहे, 'तुम्हाला काय वाटते.' रणवीरने मल्टी कलर टी-शर्ट घातला आहे. रणवीर सिंहची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना आणि इतर सेलिब्रिटींनाही आवडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर सिंहच्या या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी 2020 मध्येच संपले होते, परंतु कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि सतत पुढे ढकलला जात होता. अखेर हा चित्रपट आता 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ट्रेलर रिलीज होताच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टार्स जमतील.(हे देखील वाचा: Zomato आणि Swiggy ने 'अशा' प्रकारे दिल्या Ranbir Kapoor आणि Alia Bhatt ला लग्नाच्या शुभेच्छा; वाचून तुम्हालाही येईल हसू)

मात्र, चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप फारशी माहिती देण्यात आलेली नाही. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. खुद्द रणवीर सिंहने याबाबत फारसा काही बोलला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट विनोदी चित्रपट असला तरी एक भक्कम सामाजिक संदेशही देतो. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी आशा निर्मात्यांना आहे.