'Jawani Janeman' चित्रपटामधून पूजा बेदीची मुलगी आलिया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
Aalia furniturewala Photo Credit: Instagram

नितीन कक्कड दिग्दर्शित 'जवानी जानेमन'(Jawani Janeman) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पूजा बेदी (Pooja Bedi) हिची मुलगी आलिया फर्निचरवाला (aaliya Furniturewalla). हा एक विनोदी चित्रपट असून येत्या 1 जूनपासून ह्याचे शूटिंग सुरु होणार आहे.

पूजा एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) 'ब्लॅक नाइट' आणि 'नॉदर्न लाइट्स फिल्म्स' हया चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ह्या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ह्या चित्रपटात तब्बल 20 वर्षांनंतर तब्बू (Tabbu) आणि सैफ अली खान एकत्र दिसणार आहे. 'जवानी जानेमन' हा चित्रपट एक फॅमिली कॉमेडी आहे. विशेष म्हणजे ह्या चित्रपटात आजच्या पिढीतील मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ह्या चित्रपटातून आलिया आपला डेब्यू देत असल्यामुळे ती खूपच एक्सायटेड आणि आनंदी आहे. तसेच आपल्या सैफ अली खान आणि तब्बू यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळायला असल्यामुळे आलिया खूपच आनंदी आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.

सैफ अली खानसोबत झळकणार 'ही' स्टार किड

तसेच ब-याच वर्षानंतर अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री तब्बू ला एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्यामुळे, प्रेक्षकांमध्येही  ह्या चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता आहे. ह्याआधी सैफ आणि तब्बू 'हम साथ साथ है' हया चित्रपटात एकत्र दिसले होते. येत्या 1 जूनपासून ह्या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे.