
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची एन्ट्री होताना दिसून येत आहे. तसेच धडक चित्रपटातून इशान खट्टर, जान्हवी कपूर हे स्टार किड दिसून आले होते. तर आता अजून एक नवीन स्टार किडची सैफ अली खान सोबत झळकणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये चालू आहे.
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला ही स्टार किड म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच ती सैफचा येणारा आगामी चित्रपट 'जवानी जानेमन'मधून प्रथमच त्याच्या सोबत काम करणार आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफ स्वत:च या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मात्र आलिया ही सैफच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार असून त्याचे शूटिंग 2019 मध्ये चालू होणार आहे.

पूजा बेदीने जो जीता वही सिंकदर या चित्रपटातून काम केले आहे. तसेच टीव्ही शोच्या माध्यमातून ही पूजा बेदी झळकली होती. तर पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाला या दोघांनी 1994 मध्ये विवाह केला होता. मात्र 2003 रोजी पूजा बेदी आणि फरहान यांनी वेगळे राहण्यात सुरुवात केली.