PM Modi Congratulates Jackky And Rakul: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकुल प्रीत-जॅकी भगनानीचं केलं अभिनंदन; नवविवाहित जोडप्याला पाठवलं 'हे' खास शुभेच्छापत्र!
Jackky And Rakul, PM Modi(PC - Instagram, Facebook)

PM Modi Congratulates Jackky And Rakul: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत (Rakul Preet) आणि निर्माता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) 21 फेब्रुवारीला गोव्यात विवाहबंधनात अडकले. या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. आता या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश होत आहे. पीएम मोदींनी दोघांना विशेष पत्र पाठवून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी केले रकुल आणि जॅकीचे अभिनंदन -

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या लग्नाचे आमंत्रण पत्र पाठवले होते. परंतु काही कारणास्तव ते त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. यानंतर पीएम मोदींनी रकुल आणि जॅकीच्या नावाने एक खास पत्र पाठवले आहे. जॅकी भगनानी यांनी त्यांच्या अधिकृत X खात्यावर पंतप्रधानांचे पत्र शेअर केले आहे. (हेही वाचा - Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding:अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता जॅकी भगनानीने लग्नाचे फोटो केले पोस्ट, पाहा)

पंतप्रधानांकडून मिळालेल्या या पत्रात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यासोबतच पीएम मोदींनी या जोडप्याला आयुष्यात आनंदाचा नवा किरण येवो यासाठी प्रार्थना आणि आशीर्वादही दिले आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी नेमही राहू द्या. नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी तुमच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद,' असं जॅकीने X वरील पत्राला उत्तर देताना म्हटलं आहे. (वाचा -Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: रकुल प्रीत आणि जॅकीचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार; लग्नाची पत्रिका आली समोर)

जॅकी आणि रकुल यांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो येथे पहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

पीएम मोदींच्या विनंतीमुळे भारतात केलं लग्न -

काही काळापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील श्रीमंत वर्गातील लोकांना डेस्टिनेशन वेडिंग आणि इतर कार्यक्रम विदेशात न करता भारतात आयोजित करण्याचे आवाहन केले होते. यामुळे केवळ भारतीय स्थळांनाच चालना मिळणार नाही तर देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास आणखी मदत होईल. यानंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी त्यांच्या लग्नाचा बेत बदलला आणि त्यांनी गोव्या आपला विवाह आयोजित केला.