PM Narendra Modi Biopic: तिरंगाच्या रंगातील 'पीएम मोदी' या बायोपिक चित्रपटाचे नवे पोस्टर लॉन्च, प्रदर्शित होण्याची तारीख पुन्हा बदलली
PM Narendra Modi Biopic Poster (Photo Credit-Twitter)

PM Narendra Modi Biopic: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा येणारा बायोपिक चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख बदलली आहे. मोदी यांचा बायोपिक यापूर्वी 5 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला न येता  12 एप्रिलला प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता 5 एप्रिल रोजी हा चित्रपट पाहायला मिळणार असल्याचे नक्की झाले आहे. तसेच चित्रपटाने नवे पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adharsh) ह्याने ट्वीटरवर पोस्ट केले आहे.

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भुमिका साकारताना दिसून येणार आहे. तर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून त्याचे हे फायनल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.(हेही वाचा-PM Narendra Modi या बायोपिकमधून 'ही' अभिनेत्री साकारणार 'जसोदाबेन' यांची भुमिका)

तरण आदर्श ट्वीट:

तर जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पोस्टर 23 विविध भाषांमध्ये झळकवले होते. तर दुसरे पोस्टर 18 मार्चला भाजपा अध्यक्ष अमित शहा लॉन्च करणार होते. मात्र गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे दुसरे पोस्टर रिलिज केले नाही.