PETA India Hottest Vegetarian Celebrities of 2020: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांना पेटा इंडियाकडून 2020 च्या हॉटेस्ट सेलिब्रिटीज चा किताब मिळाला आहे. पेटा इंडिया ही संस्था पशू-पक्षांचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम करते. त्यांच्याकडून श्रद्धा आणि सोनू यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. या कठीण काळात सोनू सूद याने केलेले भरीव सामाजिक कार्याचे सर्वच स्तरातून प्रशंसा होत होते. आता पेटा इंडियाने देखील पुरस्कार देऊन अभिनेत्याला कौतुकाची थाप दिली आहे. सोनू सूद ने पुरस्काराची माहिती ट्विटरवर शेअर करत पेटा इंडियाचे आभार मानले आहेत.
सोनू सूद याने पेटाच्या प्रिंट कॅम्पेन मध्ये सहभाग घेतला होता. तसंच त्याने पेटा इंडियाच्या आवाहनाला समर्थन दिले होते. त्याअंतर्गत मॅक डॉनल्ड्स ने आपल्या मेन्यू मध्ये वेगन बर्गरचा समावेश करावा, असे सोनूने म्हटले होते. दरम्यान, आपल्या मुलासोबत क्रिकेट खेळताना सोनू ने एका कबुतराचा जीव वाचवला होता. (Sonu Sood Felicitated by GCOT: गरीब-गरजूंना केलेल्या मदतीसाठी सोनू सूद याचा 'ग्रामोदय बंधू मित्र पुरस्कार' देवून सन्मान)
Sonu Sood Tweet:
Thank you @PetaIndia pic.twitter.com/Vclwg31toH
— sonu sood (@SonuSood) December 17, 2020
त्याचबरोबर पेटाने अभिनेत्री श्रद्धा कपूर चे देखील कौतुक केले आहे. श्रद्धाने मांसाहार सोडून शाकाहारी जीवनशैली अंगिकारली आहे. तसंच प्राण्यांच्या सुरक्षिततेवरुन तिने आवाज उठवला होता.
PETA India Post:
View this post on Instagram
यापूर्वी मानुषी छिल्लर, फूटबॉल प्लेअर सुनील छेत्री, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्यूत जामवाल, कंगना रनौत, शाहिद कपूर, रेखा, अमिताभ बच्चन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पेटा द्वारे सन्मानित करण्यात आले आहे.