Paresh Rawal Tested COVID-19 Positive: ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी घेतला होता कोरोनाचा पहिला डोस
Paresh Rawal (Photo Credits: Wikimedia Commons)

बॉलिवूडभोवती कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली. यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आमिर खान, आर माधवन, रणबीर कपूर, मिलिंद सोमण यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांना सुद्धा कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मागील 10 दिवसांत माझ्यासोबत संपर्कात आलेल्यांनी कृपया तुमची टेस्ट करुन घ्या' असे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.हेदेखील वाचा- Milind Soman Tested COVID-19 Positive: बॉलिवूडकरांना कोरोनाचा विळखा! आमिर खान, आर माधवनपाठोपाठ मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

आर माधवन कोविड पॉझिटिव्ह आल्यावर त्याने '3 इडियट्स' च्या अंदाजात मजेशीररित्या ही माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मिडियाद्वारे दिला. आर माधवनने ट्वीट केलेली खास पोस्ट अशी आहे- 'फरहान ला तर रॅंचोला फॉलो करायलाच पाहिजे. 'वायरस' तर आमच्या मागे कायमच होता. पण यावेळेस त्याने आम्हांला पकडलं आहे. पण ऑल इज वेल. लवकरच कोविड देखील खड्ड्यात जाईल. ही एक अशी गोष्ट आहे जिथे आम्हांला 'राजू'ला येऊ द्यायचं नाहीए. तुमच्या सार्‍यांच्या प्रेमासाठी धन्यवाद. कोविड मधून चांगल्या प्रकारे बाहेर पडतोय.

बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यात प्रिया बापट- उमेश कामत, गायक महेश काळे, विराजस कुलकर्णी यांसारख्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे