पालघर घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत भडकली; दोषींना कठोर शिक्षा देण्याची केली मागणी
kangana Ranaut (Photo Credit: Instagram)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून गुरुवारी दोन साधूच्या समवेत तिघांची हत्या (Mob Lynching) करण्यात आली होती. या घटनेवर राजकीय नेते, कलाकार यांच्यासह भारतीय खेळाडूंनीही नाराजी व्यक्त केली आहे. यातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranuat) ट्वीटरच्या माध्यमातून पालघर हत्येकांडप्रकरणी संताप्त प्रतिक्रिया दिली आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. आपल्या राष्ट्र निर्मितीत साधू- संतानी मोठ योगदान दिले आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात घडलेल्या घटनेवर कंगना रनौत तीव्र निषेध करते. केवळ कमजोर लोकच जेष्ठांवर हात उचलतात, अशा आशायाचे कंगना रनौतने ट्विट केले आहे. या पोस्टसह तिने #JusticeForSadhu असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

गडचिंचले येथे 16 तारखेस 3 चोर आल्याची अफवा पसरली होती. या अफवेनंतर ग्रामस्थांनी दाभाली-खानवेल मार्गावरुन जाणाऱ्या गाडीला अडवले. या कारमध्ये बसलेल्या तिघांची त्यांनी विचारपूस केली. त्यांनी काही सांगायच्या आत ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तर इतर ग्रामस्थांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती कळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जमावाने पोलिसांनाही दाद दिली नाही. या तिघांची निघृण हत्या करण्यात आली, या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. त्यानंतर या तीन जणांवर आणि कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व 101 आरोपींना अटक केली आहे. हे देखील वाचा- पालघर प्रकरणावरून संतापला सुमीत राघवन; महाराष्ट्राला संतांची वीरांची भूमी नवे तर नराधमांची भूमी म्हणत केले ट्विट

कंगना रनौत टीमचे ट्वीट-

पालघर जिल्ह्यात जमावाने तीन प्रवाशांना चोर समजून दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पालघर येथील घटनेवर कार्यवाही करण्यात आली आहे. गुन्हा घडला त्या दिवशीच पोलिसांनी सर्व मारेकऱ्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. तसेच पालघरमधील घटनेवरुन विरोधकांनी राज्य सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघरमधील घटनेचे राजकारण करु नये असे आवाहन केले आहे.