Sumeet Raghvan And Uddhav Thackeray (Photo Credits: IANS/Insta)

पालघर (Palghar) मध्ये जमावाकडून झालेल्या हल्ल्यात चोर समजून दोन साधू व त्यांच्या वाहनाच्या ड्रायव्हरला दगडाने ठेचून ठार करण्यात आले, या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ही मॉब लिंचिंगची घटना अत्यंत लाजीरवाणी असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे, यावर अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) याने देखील कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 'मी सुन्न झालोय. जे घडलं ते अत्यंत भीषण, भीतिदायक, लाजिरवाणं आहे. यापुढे महाराष्ट्र ही संतांची, वीरांची भूमी आहे असं बोलण टाळूया. याउलट ही नराधमांची भूमी आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला लागलेला काळा डाग आहे. असे ट्विट सुमितने केले आहे. या ट्वीटमध्ये सुमीतने उद्धव ठाकरे, राज्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि पालघर पोलीस (Palghar Police) यांना टॅग केलं आहे.

यासोबतच सुमीत राघवन याने आणखीन तीन ट्विट केले आहेत. 'मी तो व्हिडिओ पाहिला नसता तर बरं झालं असतं. आता ते दृष्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. एखाद्या म्हाताऱ्या निर्धाराची दगडं मारून हत्या केली जाते आणि त्यांना वाचवण्याऐवजी पोलीस त्यांच्यापासूनच लांब पळत होते. आपण कुठे चाललोय हा प्रश्न आता माझ्या डोक्यात पुढील अनेक वर्ष घोळत राहणार आहे.' असे त्याने ट्विट मध्ये म्हंटले आहे. Palghar Mob Lynching Case: पालघर मॉब लिंचींग प्रकरणामागे धार्मिक कारण नाही - उद्धव ठाकरे

सुमीत राघवन ट्विट

दरम्यान, पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे हा प्रकार 16 एप्रिल रोजी रात्री घडला होता. याप्रकरणात सध्या 110 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यातील पाच मुख्य आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात कोणीही धार्मिक आणि जातीय मुद्दे काढून आग लावण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला आहे.