अभिनेत्री Shabana Azmi यांची दारूच्या दुकानाकडून ऑनलाइन फसवणूक; लोकांना दिला सावध राहण्याचा सल्ला
Actress Shabana Azmi | Photo Credits: Instagram

सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणूकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. विविध मार्गांनी चोर लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी देखील या ऑनलाइन फसवणूकीला बळी पडल्या आहेत. त्यांनी Living Liquidz या दारू पुरवणाऱ्या चेनवर आरोप करत आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. गुरुवारी शबाना यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आणि चाहत्यांना अशा फसवणूकीविषयी जागरूक राहण्याचा सल्ला दिला. शबाना आझमी यांनी ऑनलाईन दारू मागवताना त्याचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट केल होते. मात्र त्यांना ऑर्डर केलेल्या गोष्टीची डिलिव्हरी झाली नाही.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सावध रहा! माझी Living Liquidz कडून फसवणूक झाली आहे. मी यांच्या दुकानातून लिकरची होम डिलिव्हरी मागविली होती. त्यासाठी मी पैसेही भरले होते मात्र दुकाने डिलिव्हरी केली नाही. इतकेच नाही, आता जेव्हा मी दुकानाच्या कथित नंबरवर कॉल करत आहे, तेव्हा माझे कॉलही कोणी घेत नाही.’ शबाना आझमी यांनी आपल्या ट्वीटमध्ये पेमेंटचे डिटेल्सदेखील शेअर केले आहेत.

शबाना यांच्या या ट्विटनंतर त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीचे हे प्रकरण व्हायरल झाले. चाहत्यांनी आणि वापरकर्त्यांनी त्यांना पुढील कारवाई करण्याच्या सूचना देण्यास सुरवात केली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करावी असे, मुंबईच्या अंधेरी लोखंडवाला-ओशिवारा सिटीझन ऑर्गनायझेशन यांनी सूचित केले आहे. (हेही वाचा: फॅशन डिझायनर्स Manish Malhotra, Sabyasachi आणि Ritu Kumar यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने बजावला समन्स; जाणून घ्या सविस्तर)

शबाना यांच्या आधी अक्षय खन्ना, नर्गिस फाखरी आणि करणसिंग ग्रोव्हर यांसह अनेक बॉलिवूडमधील अनेक कलाकार ऑनलाइन फसवणूकीला बळी पडले आहेत. दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर शबाना आझमी या स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता अभिनीत ‘शीर कोरमा’ चित्रपटात दिसणार आहेत.