Sanjay Datt And Manyata Datt (Photo Credit: Instagram)

संपूर्ण देशात आज गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) साजरा करण्यात आला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरा करावा लागत आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी समाजिक अंतराचे पालन करत आपल्या घरी श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. महत्वाचे म्हणजे, सर्वसामन्यांसह बॉलिवूडचे अनेक कलाकारदेखील गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. यातच अभिनेता संजय दत्त (Sanjay Datt) याच्याही घरी श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. यामुळे संजय दत्तने आपल्या घरात आलेल्या श्रीगणेशासह यांच्यासोबत एक सुंदर फोटो काढून इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची पत्नी मान्यताही दिसत आहे.

संजय दत्तने आपली पत्नी मान्यता यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'या वेळी साजरा करणे दरवर्षीसारखे, भव्य नाही, परंतु बाप्पांवरील आमचा विश्वास पूर्वीसारखाच आहे. माझी अशी इच्छा आहे की, हा शुभ सण आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल आणि प्रत्येकास आरोग्य आणि आनंद देईल. गणपती बाप्पा मोरया, अशा आशयाची पोस्ट त्याने केली आहे. हे देखील वाचा- Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी निमित्त अमिताभ बच्चन, अजय देवगन, काजोल यांच्यासह 'या' बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!

इंस्टाग्रामवर पोस्ट-

संजय दत्तला याआधी श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. संजय दत्तला कर्करोग असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.