नवरात्री 2019 चं औचित्य साधत अक्षय कुमार ने शेअर केला Laxmmi Bomb सिनेमातील त्याचा 'लक्ष्मी' अंदाज!
Akshay Kumar in Laxmmi Bomb (Photo Credits: Instagram)

भारतामध्ये सध्या नवरात्रीची धूम आहे. आज देशभरात शारदीय नवरात्रोत्सवामधील षष्ठीचा उत्सव साजरा केला जात आहे. आदिशक्ती, नवनिर्मितीचा जागर करणार्‍या या नवरात्रोत्सवामध्ये प्रत्येकाने स्वतःमधील देवतेचा, अमर्याद शक्तीला समर्पित करणारा एक अनोखा अंदाज अभिनेता अक्षय कुमार याने शेअर केला आहे. अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याचा आगामी सिनेमा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमामधील खास लूक शेअर केला आहे. अक्षय कुमार तो साकारत असलेल्या 'लक्ष्मी' या भूमिकेची ही झलक आहे.  यामध्ये लाल साडी, कपाळावर कुंकू आणि मागे दुर्गा देवीची मूर्ती आहे.लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील कंचना (Muni 2: Kanchana) चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जून 2020 रोजी हा चित्रपट रीलिज होणार आहे.  Laxmmi Bomb First Look Poster: 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे पोस्टर आऊट; अक्षय कुमार अनोख्या भूमिकेत. 

अक्षय कुमारचं ट्वीट

अक्षय कुमारने आज नवरात्रीचं औचित्य साधून एका खास अंदाजातील फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. मे 2019 मध्ये अक्षय कुमारने 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाची पहिली झलक शेअर केली होती. तेव्हापासूनच अक्षयच्या सिनेमातील लूकची सर्वत्र चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.