Christmas च्या निमित्ताने अभिनेत्री सारा अली खान हिचे कलरफुल गाऊनमधील ग्लॅमरस फोटोशूट एकदा पाहाच
Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. सिम्बा, केदारनाथ यांसारख्या चित्रपटानंतर सारा लवकरच 'कुली नंबर 1' च्या रिमेकमध्ये वरुण धवन सह दिसणार आहे. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेल्या सारा ने नुकतेच आपले एक ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. ख्रिसमस च्या निमित्ताने आपण हे रंगीत कपड्यांमधील फोटोशूट केले असल्याचे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. यासाठी तिने फुलांनी भरलेला रंगीत गाऊन परिधान केला असून या ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. या फोटोशूटमुळे तिच्यातील लहान मुलांसारखी क्युट अदा आणि निखळ हास्य पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

ख्रिसमस च्या निमित्ताने आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण हे फोटोशूट केल्याचे कॅप्शन तिने या फोटोखाली दिले आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून चर्चेत असलेला देविड धवन चा कूली नंबर 1 (Coolie No.1) या चित्रपटाच्या रिमेकचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला.

हेदेखील वाचा- Coolie No.1 Poster: वरुण धवन-सारा अली खान च्या हटके लूकसह 'कूली नंबर 1' चा फर्स्ट लूक प्रदर्शित

 

View this post on Instagram

 

🌈🍿💓🦄💐🐥🦋🍭🍬🍯🔮🧸

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

हे मोशन पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विटर अकाउंटद्वारे शेअर केले होते. यात सारा अली खान (Sara Ali Khan) आणि वरुण धवन (Varun Dhawan) चा अंतरंगी लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 1 मे 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन देविड धवन (David Dhawan) यांनी केले असून वासु भगनानी (Vashu Bhagnani) हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. नव्वदीच्या दशकात ज्या चित्रपटामुळे गोविंदा रातोरात स्टार झाला आणि त्याने विनोदाचा दर्जा इतका उंचावर नेला की, तिथपर्यंत पोहोचणेही इतर कलाकारांना थोडं अशक्य झाले, त्या चित्रपटाचा रिमेक देखील तितकेच जादू करणार का आणि गोविंदा-करिश्मा कपूरची गाजलेली जोडीसारखा वरुण -साराची जोडी करिष्मा दाखवणार का हे लवकरच कळेल.