![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/Nusrat-Jahan-380x214.jpg)
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) गेल्या 2 दिवसांपासून दुर्गापूजेचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच पती निखिल जैन सह कोलकाता मधील सुरुची संघाच्या दुर्गा मंडळाला नुसरतने भेट देत दुर्गा मातेची पूजा केली. याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळाले. आता नुसरत ने सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत नुसरत दुर्गा मंडळात पारंपरिक बंगाली डान्स करताना दिसत आहे.
यात नुसरतने लाल-पांढऱ्या रंगाची बंगाली पारंपारिक साडी नेसली आहे आणि इतर महिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. कोलकाता मध्ये यास 'धाक नृत्य' असे म्हणतात. (अभिनेत्री, TMC MP नुसरत जहां हिचा फिटनेस फंडा; अर्धा तास योगा, जेवणात मासे, प्रकृती एकदम सडपातळ, घ्या जाणून)
पहा व्हिडिओ:
तसेच यास 'धुनुची नृत्य' असेही म्हणतात. परंतु, या व्हिडिओत नुसरत च्या हातात धुनुची दिसत नाही. धुनुची म्हणजे चिकणमातीचा दिवा. तो पेटवून केलेल्या नृत्याला धुनुची नृत्य म्हणतात.
इस्लाम धर्मीय नुसरत हिने मुस्लिम नसलेल्या व्यक्तीशी लग्न केल्याने तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत लग्नानंतर नुसरत हिंदू धर्माचे सर्व रितीरिवाज पार पाडताना दिसत आहे. यातूनच ती सर्व धर्मांचा सन्मान करते, हे दिसून येते.