नोरा फतेही (Photo Credits: Yogen Shah)

Money Laundering Case: अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही (Nora Fatehi) कॉनमन सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) चौकशीसाठी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात दाखल झाली आहे. नोराची याआधीही अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे तिला बोलावण्यात आले आहे.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिच्या डान्स मूव्हसाठी ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्रीला चंद्रशेखर आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) कलमांतर्गत नोंदवलेल्या वक्तव्याबाबत चौकशी केली जाईल, असे पीटीआयने म्हटले आहे. (हेही वाचा - Rohit Shetty चा पुन्हा एकदा धमाका; Cirkus चा दमदार Trailer रिलीज, रणवीरसोबत दिपीकाही आली दिसुन (Watch Trailer))

ईडीने या प्रकरणात दाखल केलेल्या आपल्या आधीच्या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवले होते, तर फतेहीचे विधान त्याच फिर्यादी तक्रारीत समाविष्ट होते. ईडीचा आरोप आहे की, 32 वर्षीय चंद्रशेखर यांनी जॅकलिन फर्नांडिससाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला. फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांच्यासह उच्चभ्रू लोकांना फसवून हा पैसा कमावला आहे. तुरुंगात असताना चंद्रशेखरवर 200 कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी ईडीच्या ताब्यात आहे.

याप्रकरणी नोरा फतेहीशिवाय जॅकलिन फर्नांडिसचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात अभिनेत्रीला आरोपी बनवले होते. गेल्या महिन्यात, जॅकलिनला 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला होता. (वाचा - Karan Johar On His Biopic: करण जोहरने त्याच्या बायोपिकसाठी सुपरस्टार Ranveer Singh ला केलं फायनल)

या आठवड्याच्या सुरुवातीला पोलिसांनी पिंकी इराणीला अटक केली होती, जिने जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरकडून अनेक आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या.