Niddhi Agerwal चा Coco हरवला; कोकोला शोधून काढणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री देणार 1 लाख रुपयांचं बक्षीस
Niddhi Agerwal (PC - Facebook)

दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल (Niddhi Agerwal) चा पाळीव कुत्रा कोको (Coco) हरवला आहे. निधीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिस सध्या कोकोचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे निधीने कोकोला शोधून देणाऱ्यास 1 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, निधीकडे गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक पाळीव कुत्रा आहे. त्याचं नाव कोको असं आहे. त्याच्या गळ्यात गुलाबी रंगाचा पट्टा आहे. त्यावर डायमंड स्टड्स आहेत. कोको केवळ आठ वर्षांचा आहे. कोकोला हृदयविकाराचा त्रास आहे. कोको 14 मार्च रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान देवट प्लाझा, रेसिडेन्सी रोड, शांतला नगर, अशोकनगर बंगळुरू येथून हरवला आहे. कोकोला शोधणाऱ्यास निधी एक लाख रुपयांचं बक्षीस देणार आहे. (वाचा - Salman Khan चा Radhe सिनेमा ठरला Most Watched Film; अभिनेत्याने ट्विट करत मानले चाहत्यांचे आभार)

Niddhi Agerwal Instagram Story (PC - Instagram)

निधी अग्रवालने 2017 मध्ये मुन्ना मायकेल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात निधीने टायगर श्रॉफसोबत काम केलं होतं. याशिवाय निधीने ‘मिस्टर मंजु’ या तेलुगु चित्रपटातून आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात केली. यानंतर निधीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे.