Salman Khan & Disha Patani (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याचा राधे: योर मोस्ट वांटेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमागृहात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच हा सर्वात अधिक पाहिला गेलेला सिनेमा ठरला आहे. याची माहिती खुद्द सलमान खान याने ट्विट करत दिली आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल सलमान खानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सलमान खान ने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले, "सर्वांना ईदच्या शुभेच्छा. तुम्ही दिलेल्या रिटर्न गिफ्टबद्दल सर्वांचे धन्यवाद. त्यामुळे राधे पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला गेलेला सिनेमा ठरला. फिल्म इंडस्ट्री तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आधाराशिवाय नाही चालू शकत." (Radhe Box Office Collection Day 1: सलमान खान च्या 'राधे' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई; जाणून घ्या चित्रपटाचे फर्स्ट डे कलेक्शन)

Salman Khan Tweet:

कोविड-19 संकटात देखील सिनेमागृहात सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याने सलमान खानने एका मुलाखतीत सर्व सिनेमागृह मालकांची माफी मागितली होती. तसंच ईदच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज करणे गरजेचे असल्याचेही त्याने म्हटले होते.

या सिनेमात सलमान खान शिवाय दिशा पटानी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, मेघा आकाश, सुधीर बाबू, चंकी पांडे, सुनील ग्रोवर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. जॅकलिन फर्नांडिस ची सिनेमात विशेष उपस्थिती सिनेमात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सलमान खान फिल्म्स आणि रिल लाईफ प्रा. लि. यांनी एकत्रितपणे हा सिनेमा निर्मित केला असून प्रभू देवा ने दिग्दर्शन केले आहे.