Ranu Mandal Dance on Srivalli: 'पुष्पा' चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर रानू मंडलचा डान्स पाहून नेटीझन्स भडकले, म्हणाले- 'हा व्हिडिओ अल्लू अर्जुनपर्यंत पोहोचवायचा आहे'
Ranu Mandal Dance on Srivalli (फोटो सौजन्य - Youtube)

Ranu Mandal Dance on Srivalli: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना  (Rashmika Mandanna) यांचा पुष्पा: द राइज (Pushpa The Rise) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'पुष्पा'च्या गाणे तसेच डायलॉग्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत आता पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर राणू मंडलचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. राणू मंडलचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती श्रीवल्लीवर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

रानू मंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रानू पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर मजेदार पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. रानूच्या या मजेदार व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. रानूच्या फनी डान्स स्टेप्स पाहून चाहत्यांना हसू आवरता येत नाही. अनेक सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ अल्लू अर्जुनपर्यंत पोहोचवला पाहिजे. (वाचा - Kabhi Eid Kabhi Diwali: सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली'शी संबंधित मोठी घोषणा, 2023 मध्ये 'या' दिवशी होणार प्रदर्शित)

एकेकाळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणे गाणारी रानू मंडल रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली होती. लोकांनी रानू मंडलला लता मंगेशकर यांचे 'एक प्यार का नगमा है' हे गाणे गाताना ऐकले होते. त्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाने रानूला चित्रपटातील एका गाण्याची संधी दिली होती. मात्र, त्यानंतर रानू मंडल गायब झाली. गतवर्षी रानू मंडलवर चित्रपट बनत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 'मिस राणू मारिया' असे या चित्रपटाचे नाव असून हृषिकेश मंडल हे या चित्रपटाचे दिग्दर्शित करत आहेत.

कोण आहे अभिनेत्री?

बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री इशिका डे बायोपिकमध्ये राणू मंडलची मुख्य भूमिका साकारत आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना इशिकाने सांगितले होते की, चित्रपटाचे शूटिंग कोलकाता आणि मुंबईत केले जाणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्तीचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं. पण लॉकडाऊनमुळे शेड्युलच्या तारखांमध्ये अडचणी आल्या आणि त्यानंतर इशिकाची निवड करण्यात आली. इशिका 'लाल कप्तान' आणि वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'मध्ये दिसली आहे.