Kabhi Eid Kabhi Diwali: सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली'शी संबंधित मोठी घोषणा, 2023 मध्ये 'या' दिवशी होणार प्रदर्शित
सलमान खान (फोटो सौजन्य- फेसबूक)

Kabhi Eid Kabhi Diwali: सलमान खान (Salman Khan) आणि साजिद नाडियादवाला या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'जीत', 'जुडवा', 'हर दिल जो प्यार करेगा', 'मुझसे शादी करोगी' आणि 'किक' नंतर आता दोघेही 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) घेऊन येत आहेत. चित्रपटाची तारीख बुक झाली आहे. पुढच्या वर्षी ईदला सलमान खान पुन्हा एकदा चाहत्यांना गिफ्ट देणार आहे. हा चित्रपट 2023 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. यात सलमान खानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा कौटुंबिक कॉमेडीवर आधारित आहे.

सलमान दरवर्षी ईदच्या दिवशी त्याच्या चित्रपटाची तारीख आधीच ठरवतो. रिपोर्ट्सनुसार, 'कभी ईद कभी दिवाली' फेब्रुवारीमध्ये फ्लोरवर जाईल. त्यासाठी मुंबईत मोठा सेट तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे याला उशीर झाला असला तरी चित्रपटाची टीम आता शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. (वाचा - Lata Mangeshkar: शाहरुख खान लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला नाही, फुंकला… जाणून घ्या इस्लाममध्ये याचा अर्थ काय?)

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या नवीन रिलीज तारखेची बातमी शेअर केली आणि लिहिलं आहे की, सलमान खान-साजिद नाडियादवाला 2023 च्या ईदला येत आहेत. साजिद नाडियादवालाचा कभी ईद कभी दिवाली, सलमान खान आणि पूजा हेगडे स्टारर चित्रपट 2023 च्या ईदला थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. याचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत.

दरम्यान, सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये 'टायगर 3', 'किक 2', 'नो एंट्री 2', 'दबंग 4', 'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल यासह इतरांचा समावेश आहे.