Neha Kakkar आणि पती Rohanpreet Singh मध्ये कडाक्याचे भांडण, गायिकेने मारामारीचा व्हिडिओ शेअर करण्यामागे काय आहे कारण?
Neha Kakkar and Rohanpreet Singh (Photo Credits: Instagram)

आपल्या जादुई आवाजाने अनेकांवर मोहिनी घातलेल्या नेहा कक्कड़ने (Neha Kakkar) ऑक्टोबर 2020 मध्ये रोहनप्रीत सिंह (RohanPreet) सोबत विवाह केला. तिच्या लग्नाला वर्ष पूर्ण व्हायच्या आतच तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला. नेहा आणि रोहनप्रीत यांच्या भांडण झाले असून वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ नेहा कक्कड़ने सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ नेहाने का शेअर केला हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तसेच हे दोघे असे का करत असावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत यांची जोडी क्युट कपल्सपैकी एक मानली जाते. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज देखील प्रचंड व्हायरल झाले होते. नेहाला तर लोकांनी सोशल मिडिया क्विन म्हणून पदवीच बहाल केली आहे. हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला तर नेहा आणि रोहनप्रीत एकमेकांसोबत मारामारी करताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Neha Kakkar-Rohanpreet Singh Wedding: नेहा कक्कड़ चे सासरी झाले ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत, पाहा धमाल Videos

या व्हिडिओच्या खाली नेहा कक्कड़ने #KhadTainuMainDassa असे हॅशटॅग वापरले आहे. या हॅशटॅगमागे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तिचा आणि रोहनप्रीतचा लवकरच एक नवा अल्बम येणार आहे. त्या अल्बमच्या प्रोमोशनसाठी नेहाने रोहनप्रीतसह हा मजेशीर फायटिंग करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे हे नेमके मारामारी का करत आहेत याचे उत्तर नेहाचा हा अल्बम रिलीज झाल्यानंतरच कळेल.

काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनप्रीतचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात ती गरोदर दिसत होती. लग्नाच्या काही महिन्यांतच हा फोटो समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर नेहाच्या 'ख्याल' या अल्बममधील हा फोटो असल्याचे समोर आले.