Neha Kakkar Birthday: वाढदिवसानिमित्त बॉलिवूड गायिका नेहा कक्कर चा 'आंख मारे' गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल; Watch Video
Neha Kakkar Dance Video (PC - Instagram)

Neha Kakkar Birthday: बॉलिवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) चा आज 32 वा वाढदिवस आहे. नेहावर चाहत्यांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यातील अनेक चाहत्यांनी नेहा कक्करचे मागील फोटो, व्हिडिओज् शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर नेहाचा ‘आंख मारे’ या गाण्यावरील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नेहासोबत कोरिओग्राफर मेल्विन लुइसदेखील डान्स करताना पाहायला मिळत आहे. आंख मारे गाण्यावरील नेहाचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेहाच्या आवाजाबरोबरचं तिच्या नृत्य कलेचाही अंदाज येतो.

नेहा कक्कर 2006 मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ मध्ये एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने गायन क्षेत्रात यश मिळवत अनेक हिट गाणी गायली. नेहाने गायलेल्या ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. (वाचा - बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना साकारणार खलनायकाची भूमिका? सोशल मीडियावर शेअर केला 'जोकर' लूकमधील फोटो)

नेहा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती आपले विविध फोटोज् आणि व्हिडिओज् सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. नेहाने अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहाने जिद्द आणि आपल्या कलेच्या जोरोवर ऋषिकेशमध्ये एक बंगला खरेदी केला आहे. यासंदर्भात नेहाने काही महिन्यांपूर्वी माहिती दिली होती. यावेळी तिने आपल्या जुन्या घराचादेखील फोटो शेअर केला होता.