बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना साकारणार खलनायकाची भूमिका? सोशल मीडियावर शेअर केला 'जोकर' लूकमधील फोटो
Ayushmann Khurrana (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या हॉलिवूड चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. आयुषमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘जोकर’ लूकमधील (Joker Look) एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आयुषमान खलनायकाची भूमिका साकारणार का? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे.

आयुषमानने शेअर केलेल्या या फोटोला अनेकांनी लाईक तसेच कमेंन्टस् केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर आयुषमानचा हा जोकर लूकमधील फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना आयुषमानने 'तुम्हाला माझ्या लुककडे पाहून वाटत असावं की, याच्याकडे काही योजना आहे का? मी काय आहे? मी असा का आहे? गाड्यांचा पाठलाग करणारा मी एक कुत्रा आहे. मला माहित नाही मला काय करायच आहे. कारण मी अराजकता पसरवणारा व्यक्ती आहे. मला जोकर सारखी एखादी थक्क करणारी व्यक्तिरेखा साकारायची आहे, ' अशी कॅप्शन दिली आहे. (वाचा -

या पोस्टमधून आयुषमानला जीवनात एकदा तरी जोकरीची भूमिका साकारायची असल्याचे स्पष्ट होतं आहे. ‘बॅटमॅन: द डार्क नाईट’ या चित्रपटात अभिनेता हिथ लेजरने जोकरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला ऑस्करसह तब्बल 23 पुरस्कार देण्यात आले होते.