नेहा धुपियाने शेअर केली मुलीची पहिली गोंडस झलक आणि नाव
Mehr Dhupia Bedi Photo credit: Instagram

अभिनेत्री नेहा धुपियाने (Neha Dhupia) रविवार, 18 नोव्हेंबर दिवशी एका चिमुकलीला जन्म दिला आहे. अंगद आणि नेहाच्या मुलीवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज नेहाने तिच्या मुलीचा पहिला फोटो शेअर करत तिचं नावही जाहीर केल आहे. नेहा आणि अंगदने मुलीचं नाव मेहर (Mehr Dhupia Bedi) ठेवलं आहे.

 

View this post on Instagram

 

Mehr Dhupia Bedi says hello to the world ... ❤️

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

नेहा धुपियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चिमुकलीची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. यामध्ये मेहरच्या पायातील सॉक्सचा फोटो आहे. यावर हॅलो वर्ल्ड असा मेसेज लिहण्यात आला आहे. नेहाच्या चाहत्यांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नेहा, अंगद आणि मेहरला शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहा आणि अंगद यांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केले. लग्नापूर्वीच नेहा गरोदर असल्याची कबुलीदेखील तिने काही दिवसांपूर्वी दिली. एका फॅशन शो दरम्यान नेहा आणि अंगद यांनी ते लवकरच आई बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होत. दिल्लीतील गुरुद्वारामध्ये 10 मे 2018  ला विवाहबद्ध झाले होते. घाईत आणि लपून छपून केल्यामुळे नेहा लग्नापूर्वी गरोदर असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरु झाली होती.