नेहा धूपिया झाली आई, अंगद बेदी बाबा; लग्नाला अवघे 6 महिने
नेहा धूपिया अंगद बेदी (Photo Credits: Yogen Shah)

अभिनेत्री आणि मॉडेल नेहा धूपियाला बडती मिळाली आहे. ती आई झाली आहे.  अंगद बेदी बाबा झाला आहे. आज (18 नोव्हेंबर) सकाळी एका कन्यारत्नाने नेहाच्या पोटी जन्म घेतला. नेहाने मुंबईच्या खार येथील महिला रुग्णालयात  बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे नेहाने काही महिन्यांपूरर्वीच (मे 2018) विवाह केला होता. तिच्या लग्नाला अवघे सहाच महिने झाले असून, अल्पावधीतच तिने आईच्या रुपात बडती मिळवली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेली माहिती अशी की, लग्नापूर्वीच नेहा प्रेग्नंट होती. मात्र, प्रेंग्नंसीच्या कारणामुळे तिने गुपचूप विवाह आटोपला होता. दरम्यान, नेहाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन आपण लवकरच आई होणार असल्याचे संकेत दिले होते. गेल्या काही दिवासात तिचा पती अंगदनेही नेहा प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते.

सुरुवातीला अंगद आणि नेहाच्या मधूर संबंधांची फारशी चर्चा नव्हती. पण, क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी नोव्हेंबर 2018मध्ये विवाहे केला. त्यांनी विवाहानंतर ठेवलेल्या रिसेप्शनला नेहा आणि अंगद एकत्र पोहोचले होते. तेव्हापासून हे कपल चर्चेत आले. विशेष म्हणजे तोपर्यंत उभयतांकडून (नेहा आणि अंगद) डेटींगबद्धलही काही खुलासा झाला नव्हता. मात्र, एक वर्ष एकमेकांना डेटींग केल्यानंतर दोघांनी गुपचूप लग्न केले.