NCB Summons Deepika Padukone's Manager: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आता ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone's) मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) ला अमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) समन्स बजावलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास सुरू आहे. आतापर्यंत या तपासात बॉलिवूडमधील अनेक नावे समोर आले आहेत. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीमध्ये दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं आहे. याशिवाय एनसीबीने टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव यांनादेखील समन्स बजावलं आहे. (हेही वाचा -Zarina Wahab COVID 19 Positive: अभिनेत्री जरीना वहाब कोरोनाबाधित, लीलावती हॉस्पिटल मध्ये 5 दिवसांंपासुन होत्या ऑक्सिजन सपोर्टवर)
एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, व्हॉट्सअॅपवरील चार्टवरून या दोघाचा ड्रगच्या प्रकरणाशी संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे या दोघांना एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. याशिवाय करिश्मा प्रकाश आणि ध्रुव यांच्यासह एनसीबीने सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांनादेखील पुढील चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
सोमवारी एनसीबी अधिकाऱ्यांनी या दोघांची पाच तासापेक्षा जास्त वेळ चौकशी केली. एनसीबीने आतापर्यंत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, सुशांतचे घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत यांच्यासह 15 हून अधिक लोकांना अटक केली आहे.