Nawazuddin Siddiqui ची पत्नी आलिया ने घटस्फोट घेण्यास दिला नकार; अभिनेत्याने सांगितलं 'हे' कारण
Nawazuddin Siddiqui (PC - Facebook)

चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी नवाजुद्दीन आणि पत्नी आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) उर्फ ​​अंजना किशोर पांडे यांच्यात बराच वाद झाला होता. नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेत आलियाने त्याला नोटीस पाठवली होती. मात्र, आता आलिया सिद्दीकीने घटस्फोटाची नोटीस मागे घेतली आहे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबरोबर आपले विवाहित जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे.

आलियाने गेल्या वर्षी नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस पाठविली होती. यात तिने अभिनेता, त्याचा भाऊ आणि कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांच्या सर्व आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता पत्नी आलियाच्या वतीने घटस्फोट न मिळाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवाजुद्दीनने आलिया आणि तिच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. (वाचा - Priyanka Chopra ने न्यूयॉर्कमध्ये उघडलं भारतीय रेस्टॉरंट; अभिनेत्रीने दिलं 'हे' नाव, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार)

नवाजुद्दीन सिद्दीकी नुकतीच बॉम्बे टाईम्स या इंग्रजी वेबसाइटला मुलाखत दिली. यादरम्यान, नवाजुद्दीने आलियासोबतच्या घटस्फोटाविषयीच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की, 'मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नाही. मी कोणाबद्दल कधीचं वाईट बोललो नाही. मला नकारात्मकता आणि द्वेष नको आहेत. ती (आलिया सिद्दीकी) माझ्या मुलांची आई आहे आणि आम्ही एक दशकहून अधिक काळ एकत्र घालवला राहिलो आहेत. काहीही झाले तरी मी तिचं समर्थन करीन. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. आलिया आणि मी एक नाही. आमचे विचार कदाचित एकमेकांना पटत नाहीत. परंतु मुले ही नेहमीचं माझी पहिली जबाबदारी आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे म्हणाले की, 'आमच्यामुळे मुलांना समस्या येऊ नयेत. त्यांचा मुलांवर परिणाम होऊ नये, असं मला वाटतं. मला एक चांगला पिता व्हायचा आहे. मानवता सर्वकाही आहे. प्रथम एक चांगली व्यक्ती व्हा. आधीचं आपण सर्व खूप त्रास सहन करत आहोत. जर साथीचा रोग आपल्यात बदल घडवून आणू शकत नसेल, तर कोणीही हा बदल इतर कोणीही नाही घडवू शकत नाही. मी नेहमीचं त्यांच्या बाजूने उभा राहीन. आपल्या प्रत्येकाने स्वत: च्या आत पाहण्याची गरज आहे. '

दरम्यान, एपीबी न्यूजशी बोलताना आलिया सिद्दीकीने खुलासा केला होता की, तिने नवाजुद्दीन सिद्दीकी यांना पाठविलेली घटस्फोटाची नोटीस मागे घेतली आहे आणि ती अभिनेत्यासोबत एकत्र राहण्यास तयार आहे. आलिया सिद्दीकीने नवाजुद्दीनचे कौतुक करत आता तो आपली खूप काळजी घेत असल्याचंही म्हटलं होतं.