नवाजुद्दीन सिद्दीकी याला घटस्फोटाची नोटिस पाठवल्यानंतर पत्नी आलिया सिद्दीकीने Extra Marital Affair बाबत ट्वीटवर येत केला खुलासा
नवाजुदीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत वाद सुरु आहेत. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या बातमीनुसार, आलियाने लग्नानंतर 10 वर्षानंतर नवाजुद्दीन याला घटफोस्टाची नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये तिने स्वत:साठी जगण्यासाठी पैशांची सुद्धा मागणी केली आहे. त्याचसोबत आलिया हिचे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर सुरु अलल्याचे तिच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. याच चर्चांना आता लगाम लावण्यासाठी आलिया हिने ट्वीटर वर अकाउंट सुरु केले असून सर्व गोष्टींचे खंडन केले असून तिचे म्हणणे समोर ठेवत स्पष्टीकरण दिले आहे.

आलिया हिने ट्वीटरवर येत तिचे म्हणणे लोकांसमोर ठेवले आहे. तिने असे म्हटले आहे की, मी आलिया सिद्दीकी. मला जबरदस्ती ट्वीटरवर यावे लागत असून मला खरी गोष्ट ठेवायची आहे. कारण माझ्याबाबत चुकीची माहिती पसरवली जाऊ नये. खरे तर खरेदी केले जाऊ शकत नाही किंवा त्याच्यासोबत कोणताही खेळ खेळला जाऊ शकत नाही.(नवाजुद्दीन सिद्दीकी ईद 2020 च्या सेलिब्रेशनसाठी कुटुंबासह उत्तर प्रदेशात दाखल; पोलिसांनी दिले 14 दिवस Home Quarantine चे आदेश)

आलिया हिने पुढे असे म्हटले आहे की, मी एका व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचा दावा केला जात आहे. मात्र मी अशा कोणत्याच नात्यात नाही आहे. या पद्धतीचा दावा करणारे रिपोर्ट्स चुकीचे आहेत. असे प्रतित होत आहे की, माडियामधील काही वर्ग लक्ष हटवण्यासाठी या पद्धतीचा दावा करत माझ्या फोटोसोबत गैरवर्तवणूक करत आहेत.

अजून एक ट्वीट करत आलिया हिने असे स्पष्ट केले की, मी माझ्या मुलांसाठी खंबीर उभे राहणे आणि बोलणे शिकत आहे. मी आजवर कोणतेही चुकीचे काम केले नसल्याने चिंता व्यक्त करत आहे. दरम्यान, एखाद्याला वाचवण्यासाठी माझी प्रतिष्ठा किंवा चारित्र्याला नुकसान पोहचवण्याचा आधार घेऊ शकत नाही. खरे तर पैशाने खरेदी केले जाऊ शकत नाही.

आलिया हिने पार्टीमधील काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. त्यामध्ये आलिया तिच्या काही मैत्रिणींसोबत मजा करत असल्याचे दिसून येत आहे. तिने हा फोटो शेअर करत असे लिहिले आहे की, मीडियाला आवाहन करते की अशा पद्धतीच्या अफवा पसरवू नये.

आलिया हिने नवाजुद्दीनला घटस्फोटासाठी नोटिस पाठवली आहे. तसेच नवाज याच्यासह परिवारावर सुद्धा आरोप आलिया हिने लावले आहेत.