अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) त्याचा भाऊ शमसुद्दीन (Shamshuddin) आणि विभक्त पत्नी अंजना पांडे (Anjana Pandey) यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी केलेल्या भ्रामक दाव्यांमुळे त्याची झालेल्या बदनामी आणि छळासाठी नुकसानभरपाई म्हणून 100 कोटी रुपयाची या दाव्यात मागणी करण्यात आली आहे. नवाजुद्दीनचे वकील सुनील कुमार यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या दाव्याचा न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.या प्रकरणाची 30 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची बदनामी करण्यापासून दोघांना कायमस्वरूपी रोखण्यासाठीचा आदेश द्यावा, अशी विनंती या याचिकेत न्यायालयालात केली आहे. सिद्दीकी यांनी विनंती केली की त्यांचा भाऊ आणि विभक्त पत्नी यांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतीही बदनामीकारक सामग्री प्रकाशित करू नये आणि त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांनी त्यांच्यावर केलेले बदनामीकारक आरोप मागे घ्यावेत. आपली बदनामी केल्याबद्दल सिद्दीकी यांनी लेखी जाहीर माफी मागावी अशी मागणी ही केली आहे.
खोटी आणि दुर्भावनापूर्ण माहिती देण्यासाठी ज्या लोकांशी संपर्क साधला त्यांच्याबद्दल संपूर्ण खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दोघांना द्यावेत, अशी विनंतीही सिद्दीकी यांनी केली आहे. या दाव्यात म्हटले आहे की 2008 मध्ये नवाझने आपला भाऊ जो बेरोजगार होता त्याला आपला मॅनेजर म्हणून ठेवले. ज्याच्याकडे ऑडिटिंग, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, जीएसटी आणि ड्युटी भरणे इत्यादी कामे होती. शमसुद्दीनला सर्व काम पहात असल्याने सिद्दीकीने आपल्या अभिनय क्षेत्रावर लक्ष्य केंद्रीत केले. सिद्दिकीच्या दाव्यात असे म्हटले आहे की, त्याने आंधळेपणाने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, स्वाक्षरी केलेले चेकबुक, बँकेचे पासवर्ड, ईमेल पत्ता आणि सर्वकाही त्याच्या भावाला दिले.
सिद्दीकीने आरोप केला की त्याच्या भावाने फसवणूक केली. व्यस्त अभिनेता असल्याने, तो दावा करतो की त्याच्याकडे शमसुद्दीनने केलेले व्यवहार आणि खर्च याबद्दल बँकेशी समन्वय साधण्यासाठी वेळ नव्हता. त्याच्या भावाने त्याला सांगितले की तो नवाझच्या नावावर मालमत्ता खरेदी करत आहे तर मालमत्ता प्रत्यक्षात संयुक्तपणे खरेदी केली गेली होती.