Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

'शाहरुख खाना'चा (Saha rukh  Khan) मुलगा 'आर्यन खान'ला (Aryan Khan) जामीन मिळाल्यानंतर बाॅलिवुड मध्ये सगळीकडे आंनदाच वातावरण पाहायला मिळत आहे, तर काही कलाकार आर्यन खानला खास पोस्ट लिहुन शुभेच्छा देत आहे. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आर्यन खानच्या अटकेपासुन तर क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रापासुन सगळ्या  मुद्द्यवार त्यांनी भाष्य केले. माध्यमांशी  बोलतानी त्यांनी थेट भाजपवर आरोप केले आहे की बाॅलिवुडला युपीला नेण्याचा भाजपचा डाव आहे. (हे ही वाचा Kranti Redkar's Letter To CM Uddhav Thackeray: क्रांती रेडकर चं पती समीर वानखेडेंवरील आरोप-प्रत्यारोपांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; 'एक मराठी माणूस म्हणून न्यायाची अपेक्षा.)

“महाराष्ट्राच्या लोकांना, जनतेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यात बॉलिवूड कलाकारांना अडकवलं जात आहे. गेल्या एका वर्षापासून हे प्रकरण सुरु आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. यातून महाराष्ट्र लोकांना, सरकारला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे.

महाराष्ट्रामध्ये दादासाहेब फाळके, व्ही शांताराम अशा अनेक दिग्गजांनी बॉलिवूडमध्ये योगदान दिलं आहे. तसेच बॉलीवूड युपीमध्ये नेण्याचा भाजपाचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डाव आहे. समीर वानखेडे यांचा वापर करून बॉलिवूडला बदनाम करण्याचा आणि मुंबई बाहेर नेण्याचे हे षडयंत्र आहे,” असे नवाब मलिक यांनी माध्यामांशी संवाद साधतांनी म्हटले आहे.