Kareema Begum (Photo Credit: Twitter)

AR Rahman's Mother Kareema Begum Passes Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) यांची आई करीमा बेगम (Kareema Begum) यांचे आज निधन झाले. सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. करीमा बेगम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. दिग्दर्शक मोहन राजा, निर्माते डॉ. धनंजयन, गायिका हर्षदीप कौर, श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, करीमा बेगम बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. मात्र, आज अखेर त्यांचे सकाळी चेन्नई येथे निधन झाले आहे. नुकताच रेहमान यांनी आपल्या आईचा फोटो ट्विटर शेअर केला होता. मात्र, त्यांनी या फोटोला कोणतेही कॅप्शन दिले नाही. रहमानच्या आईच्या निधनाच्या बातमीने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी चेन्नईतील रहमानच्या घराबाहेर जमण्यास सुरवात केली आहे. हे देखील वाचा- Farah Khan's Twitter Account Gets Hacked: फराह खान चे ट्विटर अकाऊंट हॅक; इंस्टाग्रामवर दिली माहिती

ए आर रेहमान यांचे ट्विट-

रहमान त्याच्या आईबरोबर अगदी जवळ होते. चेन्नई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रेहमान यांनी म्हणाले होते की, आपण संगीत क्षेत्रात नाव कमवू शकतो, हे प्रथम माझ्याला समजले. त्यांच्याकडे संगीत समजण्याची शक्ती होती. ती ज्या प्रकारे विचार करायची आणि निर्णय घ्यायची क्षमता खूपच होती. उदाहरणार्थ, माझे संगीत निवडणे. मी अकरावी असताना त्यांनी माझी शाळा बंद केली आणि माझे संगीत शिक्षण सुरु केले. मी संगीत श्रेत्रात नाव कमवेल, असा त्यांचा विश्वास होता.