Rhea Chakraborty Bail Update: अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीच्या जामीनावर मुंबई स्पेशल कोर्टात उद्या होणार सुनावणी
Showik, Rhea Chakraborty (Photo Credits: File Image)

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेले अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांच्या जामिनावर आज मुंबई स्पेशल कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. दरम्यान आज न्यायधीशांनी निकाल दिलेला नाही. उद्या या बाबत निकाल दिला जाऊ शकतो. अशी माहिती देण्यात आली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची मागील काही दिवसांपासून ईडी, सीबीआय आणि एनसीबी कडून कसून चौकशी झाल्यानंतर आधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि नंतर रियाला एनसीबीने (Narcotics Control Bureau) NDPS Act अंतर्गत अटक केली आहे.

दरम्यान रिया चक्रवर्तीची रवानगी काल मुंबईच्या भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. तर शौविक अधिक तपासासाठी रिमांडमध्ये होता. शौविकला काल 14 दिवसांची Judicial custody सुनावण्यात आली होती. त्याला एनसीबीने 4 सप्टेंबरला अटक केली होती. तर रियाला देखील 22 सप्टेंबर पर्यंत Judicial custody सुनावण्यात आली आहे. तिची अटक 8 सप्टेंबरला झाली आहे.

रिया चक्रवर्तीला अटक होताच तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया देताना रियाची चूक झाली की तिने व्यसनाधीन, मानसिक आजाराशी लढणार्‍या एका व्यक्तीवर प्रेम केलं. असं म्हटलं होतं. (नक्की वाचा: Rhea Chakraborty Arrested: रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर वकील सतीश मानेशिंदे यांची पहिली प्रतिक्रिया , 'रियाने व्यसनाधीन व्यक्तीवर प्रेम केले ही तिची चूक').

मुंबईमध्ये 14 जूनला सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यावेळेस तो नैराश्यात होता, काही दिवसांपूर्वी त्याचे रियासोबतचे संबंध ताणले होते असे सांगण्यात आले होते. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर राजपूत कुटुंब आणि रिया चक्रवर्ती यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. पोलिस स्थानकातही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

रियाने सुशांतच्या बहिणीवर बोगस मेडिकल प्रिसक्रिब्शन दिल्याचं आरोप करत कारवाईची मागणी करण्यासाठी पोलिस तक्रार नोंदवली आहे. रियाला अटक झाल्यानंतर बॉलिवूड मधील देखील अनेक कलाकार तिच्या पाठीची उभे आहेत.