Theater | Representational image (Photo Credits: pxhere)

Movies In Theaters For Just Rs 99: चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे. येत्या 31 मे रोजी तुम्ही फक्त 99 रुपयांमध्ये कोणताही चित्रपट पाहू शकता. तिकीट खिडकीवरील प्रेक्षकांची गर्दी वाढवण्यासाठी 31 मे रोजी 'सिनेमा प्रेमी दिन' म्हणजेच ‘सिनेमा लव्हर्स डे’ (Cinema Lovers Day 2024) साजरा केला जात आहे. या दिवशी चित्रपट निर्माते आणि चित्रपट दाखवणारे लोक चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचे आभारही मानतात. या दिनाचे औचित्य साधत, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने मंगळवारी जाहीर केले की, यंदा 31 मे चित्रपट चाहत्यांना देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रति व्यक्ती केवळ 99 रुपये दराने चित्रपट पाहता येईल.

सध्या भैय्या जी, श्रीकांत इत्यादी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये आधीच चालू आहेत. तर मिस्टर अँड मिसेस माही शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या टीमने 31 मे रोजीसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, या दिवशी चित्रपटाची तिकिटे फक्त 99 रुपयांना दिली जातील. टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

देशभरातील PVR, INOX, Cinepolls, Mirage आणि Delight सह 4,000 हून अधिक स्क्रीन्स 'सिनेमा प्रेमी दिना'च्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येत आहेत. म्हणजेच देशातील 4000 हून अधिक स्क्रीन्सवर 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येईल. 2022 पासून, मल्टिप्लेक्स आणि भारतातील बहुतेक सिंगल-स्क्रीन थिएटर ठराविक वेळी सिनेमा प्रेमी दिन साजरा करत आहेत. (हेही वाचा: Top 5 Upcoming Movies 2024: बॉलीवूड आणि साउथचे हे '5' बहुप्रतिक्षित चित्रपट या वर्षी बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, लिस्ट पाहून घ्या)

पहा पोस्ट-

याआधी सप्टेंबर 2022 मध्ये तो पहिल्यांदा साजरा झाला आणि त्यावेळी चित्रपटाची तिकिटे केवळ 75 रुपयांना विकली गेली. सप्टेंबर 2023 मध्येही सिनेमा प्रेमी दिन साजरा करण्यात आला. आता यंदा हा दिवस 31 मे रोजी पुन्हा साजरा केला जाणार आहे. यावेळी तिकिटांची किंमत 99 रुपये असेल.