
Hit Songs of Mohammed Rafi: संगीत क्षेत्रातील एक लिजेंड म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद रफी यांचा 24 डिसेंबर 1924 रोजी जन्म झाला होता. आज त्यांची जन्मतिथी आहे. फक्त बॉलीवूड पुरता मर्यादित न राहता त्यांनी विविध भाषांमध्ये आपल्या गायनाची जादू पसरवली. विविध भारतीय भाषांमधील त्यांनी एकूण 7,405 गाणी गायली असून त्यातील 4,334 गाणी हिंदी आहेत. रफींनी गायलेल्या जवळपास 70 गाण्यांकडे अधिकृत एलपी रेकॉर्ड नाहीत आणि म्हणूनच ती कधीही यूट्यूबवर अपलोड झाली नाहीत. या यादीत केवळ भारतीयच नव्हे तर अरबी, डच, इंग्रजी अशा बर्याच परदेशी भाषांमध्येही त्यांनी गायले.
मोहम्मद रफी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून स्टारडस्ट मासिकाने त्यांना मिलेनियमचा सर्वोत्कृष्ट गायक म्हणूनही घोषित केले आहे.
इतकंच नव्हे तर लता मंगेशकर, किशोर कुमार यांच्यासारख्या नामांकित गायकांसोबत देखील त्यांनी गाणी गायली. आजच्या या खास दिवशी पाहूया सर्वांच्या आवडत्या 'रफी सहाब' यांची काही सुपरहिट गाणी.
त्यांनी गायलेलं 'क्या हुआ तेरा वादा' हे सदाबहार गाणं नेहमीच आपल्या आवडत्या गाण्यांच्या लिस्ट मध्ये टॉपवर असतं. त्याच्यासोबत 'चांद मेरा दिल' हे ऑल टाइम रोमँटिक हिट सॉंग असेल. धर्मेंद्र आणि मुमताज अभिनीत 'आज मौसम बड़ा बेइमान है' हे 90 मधील फॅन्ससाठी ही एक रोमँटिक ट्रीट आहे. रफी जींचा सुरेल आवाज आणि लता मंगेशकर यांनी त्यावर सोडलेली आपली छाप असं 'जो वादा क्या वो निभाना पडेगा' हे आजही लोक सहज गुणगुणतात. जर कोणी रात्री झोपू शकत नसेल तर त्यावरचं उत्तम औषध म्हणजे 'झिलमिल सितारों का आंगन' हे गाणं.