
Shahnawaz Pradhan Passed Away: सिनेविश्वातून पुन्हा एकदा एक वाईट बातमी समोर येत आहे. मिर्झापूर अभिननेते शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे निधन झाले आहे. शाहवाज प्रधान यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, शाहनवाज प्रधान एका अवॉर्ड फंक्शनला गेले होते, तिथे त्यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र लाख प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. शाहनवाज यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून चाहते आणि स्टार्स सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
शाहनवाज प्रधान यांच्या पार्थिवावर 18 फेब्रुवारी म्हणजेच आज अंत्यसंस्कार होणार आहेत. शाहनवाज प्रधान एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील अंधेरी येथील 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या कार्यक्रमात इतर अनेक स्टार्सही सहभागी झाले होते. (हेही वाचा - Kangana Ranaut: महिलेचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची टीका)
शाहनवाज प्रधान हे 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. आपल्या कारकिर्दीत शाहनवाजने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये अभिनयाचा पराक्रम दाखवला आहे. यापूर्वी शाहनवाज यांनी ओटीटी जगतातही चांगले काम केले. अॅमेझॉन प्राइमच्या 'मिर्झापूर' या वेबसिरीजमध्येही त्याचा अभिनय चांगलाच गाजला होता. शाहनवाजने 'मिर्झापूर'मध्ये स्वीटी (श्रिया पिळगावकर) आणि गोलू (श्वेता) यांच्या वडिलांची भूमिका केली होती. त्याचवेळी शाहनवाज यांनी काही काळापूर्वी 'मिर्झापूर 3'चे शूटिंग पूर्ण केले होते.
View this post on Instagram
शाहनवाज प्रधान यांनी 'श्री कृष्ण' या मालिकेत नंद बाबाची भूमिका साकारली होती. याशिवाय तो 'देख भाई देख', 'अलिफ लैला', 'व्योमकेश बक्षी', 'बंधन सात जन्मों का' आणि 'प्यार कोई खेल नहीं', 'फँटम', 'द फॅमिली' सारख्या शोमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. 'आदमी', 'खुदा' 'हाफिज' आणि 'रईस' सारख्या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. त्याचबरोबर 'मिर्झापूर' या वेबसिरीजमध्ये त्यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.